Nashik-Pune National Highway Approval:संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण आणि अपूर्ण अवस्थेतील ठिकाणांबाबत अनेक तक्रारी आणि मागण्या गेल्या काही महिन्यांपासून नागरिक व स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होत्या. अखेर या समस्यांकडे महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आणि यासंदर्भात सखोल पाठपुरावा सुरू केला.
आ. अमोल खताळ यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील असुरक्षित आणि अपूर्ण ठिकाणांची यादी तयार करून ती केंद्र सरकारकडे सादर केली. यामध्ये विशेषतः चंदनापुरी घाट परिसरातील नागमोडी वळणं, अपूर्ण उड्डाणपूल आणि चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक यांचा उल्लेख होता. या साऱ्या बाबींमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे आ. खताळ यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
Nashik-Pune National Highway Approval
या पाठपुराव्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रलंबित कामांकडे तातडीने लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी संबंधित विभागांना लवकरात लवकर सुधारणा व डागडुजीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
चंदनापुरीसह इतर ठिकाणी महामार्ग सुधारणा झाल्यास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे अपघातांचं प्रमाणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी आ. खताळ यांच्या या सक्रिय भूमिकेचं स्वागत केलं असून, पुढील काळात आणखी सुधारणा व्हाव्यात, अशी मागणीही केली आहे.

मेरा नाम मंगेश है और मैं पिछले 6 सालों से ब्लागिंग कर रहा हूं मुझे ऑटोमोबाइल स्मार्टफोन सरकारी योजना से संबंधित जानकारी लोगों तक पहुंचाना पसंद है इसलिए मैं यह जानकारी मेरी वेबसाइट newasalive18 के माध्यम से लिखता हूं। यह जानकारी आपको कैसी लगती है यहां आप मुझसे संपर्क करके मुझे बता सकते हो।