भारताची BFS प्रणाली: ग्रामपंचायत पातळीवर हवामानाची सर्वात अचूक माहिती

भारताची BFS प्रणाली:भारताने जगातील अत्यंत अचूक हवामान प्रणाली विकसित केली आहे, जी अमेरिका, यूके किंवा युरोपियन युनियन सारख्या प्रगत देशांमध्येही उपलब्ध नाही. ‘BFS’ (भारत फोरकास्ट सिस्टम) असे नाव असलेल्या या प्रणालीद्वारे भारतातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर हवामानाची अचूक माहिती दिली जाऊ शकते. या प्रणालीविषयी आता सविस्तर जाणून घेऊया.

शेतीस उपयुक्त ठरणारे फायदे

एका विशिष्ट ग्रामीण भागासाठी अचूक हवामान अंदाज वेळेवर न मिळाल्यामुळे भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसला होता. अनेक शेती क्षेत्रे प्रभावित झाली आणि शेतकरी आपली उपजीविका गमावून त्रस्त झाले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठीच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

IITM ची निर्मिती

ही प्रगत हवामान प्रणाली IITM (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी) ने विकसित केली असून, ती भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. नवीन प्रणालीत अधिक चांगले रिझोल्यूशन आणि भौगोलिक कव्हरेज आहे. IMD च्या माहितीनुसार, ही प्रणाली पाच दिवस आधीच अचूक हवामान माहिती देऊ शकते.

अत्याधुनिक प्रणाली

सध्या भारतात वापरली जाणारी ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS) ही केवळ 12 किमी रिझोल्यूशनसह हवामान माहिती पुरवते. परंतु भारतात विकसित झालेली BFS प्रणाली 6 किमी रिझोल्यूशनवर कार्य करू शकते, जी अधिक अत्याधुनिक मानली जाते.

केवळ चार तासांत अंदाज

भारताची BFS प्रणाली
भारताची BFS प्रणाली

ही नवीन प्रणाली ‘आर्का’ नावाच्या नवीन सुपरकंप्युटरवर कार्यरत आहे. पूर्वी वापरल्या जाणाऱ्या ‘प्रत्युष’ सुपरकंप्युटरला अंदाज तयार करण्यासाठी 10 तास लागायचे, पण आता ही प्रणाली केवळ 4 तासांत अंदाज तयार करू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रडार्स

सध्या देशभरात 40 डॉपलर हवामान रडार्स कार्यरत आहेत आणि लवकरच ही संख्या 100 पर्यंत नेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून उच्च-रिझोल्यूशन, स्थान-विशिष्ट हवामान अंदाज देता येतील, असेही सांगण्यात आले.

भारताची हवामान प्रणालीचे फायदे

पुढील दोन तासांत कोणत्या भागात कसे हवामान असेल याचा अल्पकालीन डेटा ही प्रणाली देऊ शकते. तीव्र हवामान परिस्थिती आधीच अचूकपणे ओळखणे आणि त्या आधीच योग्य उपाययोजना करणे यामध्ये ही प्रणाली अतिशय उपयुक्त ठरते, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment