जर तुम्हाला देखील फोर व्हीलर कार कमी किमतीत अतिशय चांगले फीचर्स असलेली खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी Honda Elevate ही कार चांगला पर्याय ठरू शकणार आहे. ही कार Tata आणि Mahindra यांसारख्या उत्तम ब्रांड पेक्षाही दमदार ठरणार आहे. ही कार केवळ 13 लाखाच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये तुम्हाला मिळणार असून या कारमध्ये सेफ्टी फीचर्स आणि स्मार्ट फीचर्स त्याचबरोबर शक्तिशाली इंजिन आणि आकर्षक डिझाईन देखील तुम्हाला मिळणार आहे. ही कार अलीकडेच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे.चला तर मग याच कारची संपूर्ण माहिती आज आपण बघुयात सविस्तरपणे.
Honda Elevate चे डिझाईन
सर्वात पहिले आपण Honda Elevate या कारच्या आलिशान डिझाईन बद्दल बोलूयात कंपनीने या कारला मस्कुलर आणि आकर्षक लूक दिलेला आहे या कारच्या फ्रंटमध्ये मोठी आणि युनिक ग्रील सोबत दमदार एलईडी हेडलाईट दिल्या आहेत.तर केबिनमध्ये मॉडर्न आणि फ्यूचरिस्टिक डॅशबोर्ड दिलेला आहे.ज्यामध्ये प्रीमियम क्वालिटीचे आरामदायक लेदर सीड्सचा वापर केलेला आहे जे कारच्या इंटिरियरला लक्झरी फील देतात.
Honda Elevate चे ऍडव्हान्स फीचर्स

Honda Elevate या कारची डिझायनच नाही तर फीचर्स देखील खूप लेटेस्ट आहे.त्यामध्ये तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल दिलेले आहे. त्याचबरोबर सेफ्टी फिचर्स मध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), सीट बेल्ट अलर्ट यासारखे ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स कंपनीने दिलेले आहेत.ज्यामुळे तुम्ही प्रवास करताना तुम्हाला उत्तम अनुभव आणि सुरक्षितता मिळते.
सेफ्टी फिचर्स
Honda Elevate मध्ये सेफ्टीचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या SUV मध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखे अनेक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS (Advanced Driver Assistance System) सारखी आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेफ्टी सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
Honda Elevate चं प्रीमियम इंटीरियर
गाडीच्या आतील भागात म्हणजेच इंटीरियरमध्ये सॉफ्ट टच मटेरियल वापरलं असून लेदर सीट्स खूपच आरामदायक आहेत. यामध्ये मॉडर्न डॅशबोर्ड डिझाइन असून, भरपूर लेग स्पेस, रियर एसी वेंट्स आणि मोठा बूट स्पेस देखील देण्यात आला आहे. केबिनमधील प्रत्येक गोष्ट ही वापरकर्त्याच्या आराम आणि स्टाईलला लक्षात घेऊन तयार केली गेली आहे.
Honda Elevate चे इंजिन
Honda Elevate या कारमध्ये दमदार परफॉर्मन्स देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे.कंपनीने या कारमध्ये 1.5 लिटर 1498cc क्षमता असलेले चार सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलेले आहे. जे 119 बीएचपी पावर निर्माण करते. या इंजिनसह तुम्हाला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिलेले आहे.त्यामुळे तुमचा प्रवास अतिशय सुखद होईल. याचबरोबर या कारमध्ये तुम्हाला मायलेज देखील चांगल्या प्रतीचे मिळणार असल्याने ही कार तुमच्या बजेटमध्ये परफेक्ट ठरू शकते.
Honda Elevate ची किंमत
जर तुम्हाला महिंद्रा आणि टाटा पेक्षाही कमी बजेटमध्ये चांगली फीचर्स देणारी कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही Honda Elevate ही कार ऑप्शन मध्ये ठेवू शकता. या कार मध्ये तुम्हाला जबरदस्त सेफ्टी फीचर्स आणि आधुनिक टेक्नॉलॉजी मिळते. सध्या बाजारामध्ये या SUV ची किंमत ₹13.62 (एक्स शोरूम) पासून सुरू होते.
जर तुम्हाला गाडी फायनान्सवर घ्यायची असेल, तर बहुतांश बँका आणि NBFC कंपन्या केवळ ₹1.5 लाख डाऊन पेमेंटवर EMI प्लॅन देतात, ज्यामध्ये ₹17,000 ते ₹20,000 दरमहा EMI भरावा लागतो.
निष्कर्ष
Honda Elevate ही एक अशी SUV आहे, जी लूक, फिचर्स, सेफ्टी आणि परफॉर्मन्स यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जर तुम्ही Tata, Mahindra किंवा Hyundai सारख्या ब्रँड्सऐवजी काहीतरी वेगळं आणि परवडणारं शोधत असाल, तर Honda Elevate तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Honda Elevate ला नक्कीच तुमच्या यादीत सामील करा.
Related posts:
VinFast VF6: स्टाइलिश डिजाइन, दमदार रेंज और किफायती कीमत वाली शानदार इलेक्ट्रिक SUV
₹6 लाख में घर ले आए दमदार SUV! Tata Punch बना फैमिली की पहली पसंद
सिर्फ 1 लाख डाउन पेमेंट में घर लाएं Tata Tiago EV, मिलेगी 315km तक की रेंज और कम EMI का फायदा!
Ather 450 Apex: सबसे तेज़ और प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर, Ola और TVS को देगा कड़ी टक्कर!
Bajaj Pulsar NS125: स्टाइलिश लुक्स, दमदार परफॉर्मेंस और बजट-फ्रेंडली कीमत में युवाओं की पहली पसंद
Volvo C40 Recharge: 59 लाख में लॉन्च हुई लग्ज़री इलेक्ट्रिक SUV, 530km रेंज और 27 मिनट चार्जिंग के स...

Hello! I am Mangesh Bhongal – I have been blogging for the past 3 years, with a passion for writing about topics such as government jobs, schemes, mobile phones, and automobiles. My only goal is to deliver accurate and useful information to common people.